
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील भुषण पाटील यांची केळी उत्पादक शेतकरी संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.संघाच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन भुषण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील भुषण पाटील हे केळी पिकामध्ये विविध प्रयोगातून नफ्याची शेती करीत असतात.त्यांची केळी उत्पादकांविषयी असलेली तळमळ व केलेल्या कार्याची दखल घेवून केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने भुषण पाटील यांची धुळे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केळी उत्पादक शेतकरी संघाच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी नुकतीच यांची जिल्हाक्षपदी निवड केली आहे.
भूषण अशोक पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदी निवडी झाल्या बद्दल जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी भटाणे सरपंच स्वर्णा पाटील ,उपसरपंच महिंद्र गिरासे ,सोसायटी चेअरमन समाधान पाटील, संचालक चेतन पाटील, रवींद्र ईशी, ज्ञानेश्वर पाटील ,राजपाल साळुंखे ,स्वप्नील साळुंखे , किशोर पाटील ,माजी उपसरपंच अशोक पाटील दिनेश पाटील आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार केला.