कॉम्प्युटर चोर पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:- चोरांनी चक्क उर्दू शाळेला टार्गेट करत शाळेतील कॉम्प्युटर लॅब मधील 60 हजार किंमतीचे 3 कॉम्प्युटर चोरी केल्याची घटना घडली होती.याबाबत पोलीसांनी शिताफीने तपास करत एका संशयिताला ताब्यात घेत चोरी केलेले सर्व कॉम्प्युटर जप्त करण्यात आले आहेत.

व्हिडीओ बातमी

शिरपूर शहरातील नगरपारिषदेच्या ऊर्दू मुलांची शाळा क्र 4 मधील वरच्या मजल्यावर असलेल्या कॉम्प्युटर लॅबचे दरवाजाचे कुलूप तोडून लॅब मधील 60 हजार किंमतीचे तीन कॉम्प्युटरची चोरी झाल्याची तक्रार दि 22 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात करण्यात आली होती.याबाबत शिरपूर शहर पोलीसांकडून तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या शोध पथकमार्फत तपासचक्रे फिरवून अज्ञात संशयिताचा शोध घेत पोलीसांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहिती च्या आधारे पोलीस पथकातील शोध पथकाने मोहमद्दीय हॉल जवळ राहणाऱ्या अजरोद्दीन शेख कमरोद्दीन शेख वय 23 या संशयिताला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देत त्याच्या ताब्यातून 3 कॉम्प्युटर संच पोलीसांनी जप्त केले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शोध पथकातील ललित पाटील, लादुचराम चौधरी , गोविंद कोळी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी, मुकेश पावरा,स्वप्नील बांगर,मनोज दाभाडे व प्रशांत पवार आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: