
बातमी कट्टा:- नंदुरबार लोकसभा निवडणूकीत खासदार डॉ हिना गावीतांचा वाढता विरोध बघता भाजप पक्ष कदाचित उमेदवार बदलेल असे तर्क लावले जात असतांंना भाजपने पुन्हा डॉ हिना गावीतांंना उमेदवारी जाहीर केली.डॉ गावीत यांच्या समोर काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळत नसल्याची चर्चेला उधान येत असतांना काँग्रेस पक्षाने परफेक्ट गुगली टाकत नवा चेहरा निवडणूकीच्या रिंगणात उतरवला. सुरुवातीला काँग्रेसचे कोण गोवाल पाडवी ? अशा पध्दतीने विरोधकांकडून टिका होत असतांना मात्र तरुणांमध्ये गोवाल पाडवींची चांगली क्रेज वाढली आहे. यामुळे डॉ हिना गावीतांसमोर कडू आव्हान उभे राहीले आहे. आणि यामुळे कदाचित भाजपच्या सभेत कोण गोवाल पाडवी हे बोलणे आता बंद झाले आहे.
काँग्रेस पक्षाने नवीन आणि फ्रेश चेहरा उमेदवारीच्या रिंगणात उतरवून रणनिती खेळली आहे.दोन वेळा खासदार असणाऱ्या डॉ हिना गावीतांसमोर उच्चशिक्षित वकील उमेदवार डॉ गोवाल पाडवी काँग्रेस पक्षाची उमेदवारी करत आहेत. यापूर्वी गोवाल पाडवी यांना जास्ततर कोणी बघितले नसून गोवाल पाडवी फक्त आमदार के सी पाडवी यांचे सुपूत्र असल्याची माहिती सर्वांना परिचित होती.यामुळे सर्वांना असे वाटत होते की गोवाल पाडवी हे राजकारणाच्या रिंगणात सपशेल अपयशी ठरतील.
पण याउलट सर्व काही घडतांना दिसत आहे. गोवाल पाडवी यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढत आहे.तेजस्वी चेहरा आणि शांत स्वभावामुळे गोवाल पाडवी सर्वांसाठी जवळचे वाटत आहेत.आपल्या भाषणात मोजक्या शब्दात अनेक गोष्टी सांगून जात आहेत.काँग्रेस पक्षाने गोवाल पाडवी यांना उमेदवारी देऊन खरतर भाजपच्या हिना गावीतांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.नंदुरबार लोकसभेच्या खासदारकीच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल हे येणारा काळ ठरवीलच पण नंदुरबार लोकसभेत काँग्रेसचे गोवाल पाडवी आणि डॉ हिना गावीतांमध्ये काटे की टक्कर बघायला मिळणार हे नक्की….