बातमी कट्टा:- कोरोनामुळे आई-वडील, पती-पत्नी, मुलगा- मुलगी गमावलेल्या सर्वांना एकाच छताखाली बोलवून कोविडग्रस्त कुटुंबांना जागेवर लाभ मिळावा यासाठी मिशन वात्सल्य अंतर्गत शासकीय प्रशासन ,कुरखळी ग्रामविकास मंच व कुरखळी ग्रामपंचायतीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते.राज्यातील हा प्रथम कार्यक्रम शिरपूर तालुक्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शासनाच्या मिशन वात्सल्य अंतर्गत शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे जिवलग गमवलेल्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासकीय प्रशासन,कुरखळी विकास मंच व कुरखळी ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी 94 एकल व 50 विधवा महिलांना कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी आमदार काशिराम पावरा,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे,महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे,अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,तहसीलदार आबा महाजन,पं.स.सभापती सत्तारसिंग पावरा,उपसभापती धनश्री बोरसे,बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार,तालुका आरोग अधिकारी डॉ राजेंद्र बागूल,जि.प.सदस्य भैरवी सिरसाट, प.स.सदस्य शिजय खैरणार,जि.प.माजी सदस्य दिनेश मोरे,अशधूत मोरे,प्रवीणसिंह गिरासे,सरपंच सीताराम भिल,कुरखळी ग्रामविकास मंचचे योगेश्वर मोरे आदी जण उपस्थित होते.
कोरोनात आई वडील गमावलेल्या तीन बालकांना प्रत्येकी पाच लाखांच्या मुदत ठेवींचे वितरण करण्यात आले तर उपस्थित लाभार्थी कुटुंबीयांना प्रत्येकी सहा लाभार्थ्यांमागे एक पालक अधिकारी असे नियोजन करुन त्यांच्या समस्या जाणून घेत योजनेची माहिती देणे ,अर्ज भरुन घेत आवश्यक त्या कागदपत्रे स्विकारण्यात आले.व स्टॉल द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध विभागांचे स्टॉल टेबल लावण्यात आले होते.पंचायत समिती शिक्षण विभाग,महसूल विभाग,पंचायत समिती कृषी विभाग,ग्रामपंचायत विभाग,पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद), समुपदेशन केंद्र,बँक,आधार कार्ड नोंदणी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी,स्वयंसेवी संस्था, नगरपालिका ,आरोग्य विभाग,लुपिन फाऊंडेशन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना पकल्प शिरपूर विभाग यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
कुरखळी येथील योगेश्वर मोरे यांच्यासह कुरखळी विकास मंचचे सदस्य,ग्रामपंचायत व आदर्श विद्यालयातील शिक्षकवृंद व प्रशासनाने यासाठी मेहनत घेतली आहे.