कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सरपंचांसोबत मुख्यमंत्री साधणार संवाद….

बातमी कट्टा:- कोवीड-19 संसर्गात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या सरपंचासमवेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज बैठकीतून संवाद साधणार आहेत. यात धुळे जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांसभवेत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आज संवाद साधण्यात येणार आहे.

दि 7 व 8 जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोवीड 19 संसर्गात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंच समावेत बैठक घेऊन संवाद साधणार आहेत.

याबाबत अप्पर मुख्य सचिव यांच्या सुचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोवीड प्रादुर्भाव समस्येवर मात करण्याकरीता ग्रामस्थांनी सरपंचांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्यवाहीचे निकष निश्चित करून तसेच दुर्गम,सुविधा नसलेली मोठी,लहान इ गावांच्या प्रकारानुसार यशाचे निकष ठरविण्यात आले व त्या पाश्र्वभूमीवर सरपंच व ग्रामस्थांनी केलेल्या कार्यवाहीनुसार गावांची निवड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय 2 किंवा 3 गावांची निवड करुन त्या गावांच्या यशोगाथेबद्दल संक्षिप्त माहिती इ-मेल द्वारे मागविण्यात आले होते.तसेच त्या गावांच्या सरपंचांना आवश्यक त्या माहितीसह निश्चित केलेल्या दिनांकास जिल्हा मुख्यालातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बैठकीत संवाद साधणार आहेत.

आज धुळे जिल्ह्यातील देखील 3 महसूल विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांसोबत आथ दुपारी संवाद साधण्यात येणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: