
बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात कोळी समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करत जिल्हा परिषद सदस्या बेबिबाई पावरा यांच्या विरुद्ध घोषणा देत पोलिस अधिकारींना निवेदन देण्यात आले.

टोकरे कोळी,महादेव कोळी,ढोर कोळी,मल्हार जमाती बांधवांच्या वतीने शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात रास्तारोको आंदोलन करत जिल्हा परिषद सदस्या बेबिबाई पावरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.निवेदनात म्हटले की काही दिवसांपूर्वी जि.प.सदस्या बेबिबाई पावरा यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
त्यादरम्यान कोळी समाजा बाबत वक्तव्य केले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीने रास्तारोको आंदोलनाला थांबवण्यात आले.
शिरपूर विधानसभा 2024
- तुम्हाला काय वाटतं ? लिंक वर क्लिक करा आणि कमेंट मध्ये लिहा