क्रांतीनंतर ते शिंगावे रस्त्याचे भुमिपूजन

बातमी कट्टा:- जि.प. धुळे येथील विशेष दुरुस्ती योजनेतून लेखाशिर्ष ३०-५४-२४-१९ सन २०-२१ या वित्तीय वर्षात शिरपूर तालुक्यात १० रस्ते जि.प. अध्यक्ष यांचेकडून मंजूर करण्यात आले.त्यापैकी शिंगावे येथे रामा-४ /ईजी -३७ येथील क्रांतीनगर ते शिंगावे गावा पर्यंतचा डांबरीकरण रस्ता माजी शालेय शिक्षण मंत्री, शिरपूर नगरीचे भाग्यविधाते, आमदार अमरीश भाई पटेल यांच्या आशीर्वादाने तसेच शिरपूर आमदार काशीराम पावरा,शिरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि.प. सदस्य देवेंद्र पाटील यांच्या सहकार्याने व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य शिंगावे गण चंद्रकांत पाटील, शिंगावे ग्रा.पं. उपसरपंच भुरा पाटील यांच्या पाठपुराव्याने क्रांती नगर ते शिंगावे रस्त्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला.

मान्यवरांच्या हस्ते पुजा करुन नारळ फोडण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, यतीश सोनवणे, मा सरपंच प्रताप आधार पाटील, सरपंच मंजुळाबाई पाटील, उपसरपंच चंद्रकांत लोटन पाटील (भुरा), हिगोणी चे सरपंच सोमा भिल, सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, हंसराज पाटील, शांतीलाल पाटील, भिला पाटील, भटू आप्पा माळी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, गोविंद थोरात, प्रा. अरुण पवार, आनंदा भिल, मनोहर भिल, धीरज पाटील या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एन.डी.पाटील, विश्वासराव पाटील, जयवंत पाटील माजी संचालक शिसाका, आर. एस. पाटील सर नवल पाटील, जिजाबराव पाटील, अशोक पाटील, लोटन पाटील, मिलिंद पाटील, दिनेश पाटोळे, गंपू निकम, शिवा थोरात मधुकर पाटील, छोटू पाटील, शशिकांत पाटील, मुरलीधर पाटील, राजेंद्र आगळे, लिलाचंद पाटील, विजय पाटील, विठ्ठल पाटील, लोटन भाऊराव पाटील, बंटी गोसावी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन आर.एस.पाटील सर यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: