
बातमी कट्टा:- स्कुटीवर जात असतांना रस्त्यावरील खड्यांमुळे तोल जाऊन खाली पडल्याने 21 वर्षीय तरुणीचा मागून येणाऱ्या भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 29 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे.घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 29 रोजी सायंकाळी 6 वाजता शहादा तालुक्यातील अनरद बारी जवळ हॉटेल उमिया समोर शहादा कडून शिरपूर कडे जाणाऱ्या एम एच 18.बिडब्ल्यु.0274 क्रमांकाच्या स्कुटीवर जाणाऱ्या हर्षदा रवींद्र ठाकरे वय 21 रा.वावडे जवखेडा तालुका अमळनेर या तरुणीचा रस्त्यावरील खड्यांमुळे तोल गेल्याने खाली पडल्याने एम एच ३४ बीजी 5885 क्रमांकाच्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
हर्षदा रवींद्र ठाकरे ही आपले मावस भाऊ आणि मावस बहिणीसोबत दुनाकीने तोरणमाळ वरून येत असताना अनरद बारी जवळील हॉटेल ओमीया समोर खराब रस्त्यामुळे तिचा तोल गेल्याने मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 34 बीजी 58 85 या ट्रकच्या चाकाखाली डोके आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मावस भाऊ रोहित धनराज पाटील 21 व मावस बहीण गायत्री धनराज पाटील 20 हे किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालक गाडी जागेवर सोडून पसार झाला असून ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील ,उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथकासह घटनास्थळी दाखल होते.सारंगखेडा ते शहादा रस्त्याची प्रचंड दैनिय अवस्था झाल्याने खड्डा चुकवताना असे अनेक अपघात ही नित्याचीच बाब असल्याने नागरिकांनी महामार्ग विभागा बद्दल घटनास्थळी प्रचंड आक्रोश व्यक्त केल्या.
