खळबळजनक ! पोटच्या मुलानेच केला पित्याचा खून…

बातमी कट्टा:- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानेच जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार साक्री तालुक्यातील छावडी येथील
डुबक्या नाल्याजवळ राहणारे सजन तिरसिंग पवार हे त्यांंचा मुलगा सतिष पवार दोघे दि 11 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात जेवण करीत होते. तेव्हा सतिष याने वडीलांकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र वडील सजन पवार यांनी पैस दिले नाही, त्याचा राग येवून सतिष याने पावडीच्या लोखंडी दांडक्याने सजन पवार यांच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी शंकर कैलास पवार याच्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसात मारेकरी मुलगा सतिष सजन पवार यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित सतिष पवार याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एपीआय पाटील करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: