बातमी कट्टा:- तरुणाचा शिर धडावेगळे मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि २३ रोजी उघडकीस आली आहे.घटनास्थळी शिर आढळून आले नाही.अत्यंत निर्घृण पणे खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.भयंकर दृश्य बघून उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला.हातावरील गोंदलेल्या नावावरून मयताची ओळख पटली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील अवधान शिवारात सोना दोरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत निवृत्त पोलीस महेंद्र वाघ हे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.बकऱ्या चारुन परत येत असतांना त्याठिकाणी त्यांंना मृतदेह आढळून आला.त्यांनी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशनला संपर्क साधत खूनाची माहिती दिली.घटनास्थळी मोहाडी पोलीस दाखल झाले.धड शिरवेगळा तरुणाचा मृतदेह आढळून आला.मात्र घटनास्थळी शिर मिळुन आलेले नाही.अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे पोलीसांना प्रथमदर्शनी दिसून आले असून जवळच मोठा दगड आढळून आला तर मृतदेहाजवळ बियरचे तीन रिकामे टीन व प्लास्टिक तीन ग्लास मिळुन आले. मृताच्या हातावर सतिष नाव गोंदलेले असल्याचे दिसून आले.काही वेळानंतर खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली.मयताचे नाव सतिष बापू मिस्तरी वय ३० रा.दंडेवाले बाबानगर मोहाडी असे समजले.
मयत सतिष मिस्तरी याचे नातेवाईक घटनास्थळावर दाखल होत आक्रोश व्यक्त केला.घटनेच्या काही वेळानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.या निर्घृण खूनाच्या घटनेमुळे संपूर्ण धुळे हादरले आहे.याबाबत पोलीसांकडून चौकशी कार्यवाही सुरु होती.


