बातमी कट्टा:- दहिहंडी, मोहरम आणि नवरात्री उत्सव बंदोबस्तासाठी नेमणूक केल्याबद्दल होमगार्ड यांच्या कडून 4 हजार पाचशे रुपयांची लाच स्विकारतांना तालुका समादेशक अधिकारीला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
तक्रादार हे शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील रहिवासी असून ते होमगार्ड म्हणून शिंदखेडा येथे कार्यरत आहेत. त्यांना दहिहंदी आणि मोहरम बंदोबस्तासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे नेमण्यात आले होते.त्यानंतर त्यांचे तालुका समादेशक दगडु गणपत कुंभार रा.शिंदखेडा यांनी तक्रारदार यांना भेटून दहिहंदी व मोहरम बंदोबस्तात नेमणूक केल्याच्या मोबदल्यात २५०० रुपये व त्यांचे सहकारी होमगार्ड यांना नवरात्रोत्सव बंदोबस्तात नेमणूक केल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये असे ऐकुण ४ हजार पाचशे रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना प्राप्त झाली होती.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे खळ्यात सापळा रचून तालुका समादेश अधिकारी दगडु कुंभार यांनी तडजोडीअंती आज दि 13 रोजी 4 हजार पाचशे रुपये स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे,राम कदम, शरद काटके,भुषण खलाणेकर, संतोष पावरा,भुषण शेटे,संदीप कदम,रामदास बारेला,रोहिणी पवार,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर, गायत्री पाटील, वनश्री बोरसे,प्रशांत बागुल,प्रविण पाटील, मकरंद पाटील आदींनी केली आहे.