
बातमी कट्टा:- खान्देशचे नेते माजी मंत्री रोहीदास पाटील यांची प्रकृती खालवली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ते मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यासह खान्देशाचे नेते माजी मंत्री रोहीदास पाटील हे कोल्हापूर येथे आपल्या मुलीकडे गेले होते.तेथे त्यांना अस्वस्थ वाटल्याने कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र कालपासून त्याची प्रकृती खालवली असून फुफ्फुस कमी क्षमते काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यांचे सुपुत्र विनय पाटील व आमदार कुणाल पाटील हे सोमवारपासून कोल्हापूर येथे दाखल झाले आहेत.रुग्णालयात गर्दी न करता हितचिंतक व कार्यकर्ते यांनी आप आपल्या घरीच माजी मंत्री रोहीदास पाटील यांच्या दिर्घायुष्य साठी प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.