बातमी कट्टा:- प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेले तापी परिसरातील शिरपूर तालुक्यातील बाळदे तिर्थक्षेत्रात आषाढी एकादशीला प्रत्यक्ष पंढरपूरच अवतरल्याचा अभास होतो.लाखोच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे दाखल होत असतात. नवसाला पावणारे दैवत म्हणून जिल्ह्यात या तिर्थस्थळाची ओळख असून उद्या दि 29 रोजी आषाढी एकादशीनिमित्त याठिकाणी यात्रोत्सव होत आहे.लाखोंच्या संख्येने उद्या भाविक प्रतिपंढरपूर बाळदे येथे दर्शनासाठी येणार असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्ट तर्फे पुर्वतयारी तयारी करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस पथकाकडून देखील बाळदे येथे भेट देण्यात आली असून पोलीस प्रशासन व होमगार्ड बाळदे येथे तैनात करण्यात आले आहे.पहाटे 5 वाजता काक्कड आरती नंतर सकाळी 7 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, आमदार काशिराम पावरा,प्रांताधिकारी ,पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते आरती होणार आहेत.
यात्रेत हॉटेल्स, फोटो विक्री, रसवंती, मनोरंजनाची साधने दाखल झाले आहेत.संपूर्ण मंदिर परिसरात सजावट करण्यात आले असून सिसिटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत.भाविकांसाठी शिरपूर बसस्थानकातून जादा बससे सोडण्यात येणार आहे.यात्रोत्सवासाठी संस्थानाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील,सचिव निंबा पाटील व संचलकांनी संयोजन केले आहे.