बातमी कट्टा:- उष्णतेच्या लाटा दिवसेंदिवस वाढत असतांना काल उष्माघाताने एका कष्टाळू तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.खान्देशात गेल्या दोन दिवसांपासून उष्णेतेची लाट पसरली असून 40 अंशाच्या वर पारा चढला आहे.

जळगाव मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जितेंद्र संजय माळी या 33 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना दि 29 रोजी घडली आहे.जितेंद्र माळी खमण विक्री करुन आपला उदरनिर्वाह करत होते.काल खमण विक्री करुन जितेंद्र माळी हे दुपारी घरी येऊन दुपारी शेतात जाऊन काम केले.

शेतात जितेंद्र माळी यांना चक्कर आली.त्यांना अन्य मजूरांनी रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर अमळनेर येथे घेऊन जात असतांना जितेंद्र माळी रस्त्यावर बेशुद्ध पडला.ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला.मेंदूत रक्तश्राव झाल्याने जितेंद्र माळींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.