बातमी कट्टा:- देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.मात्र या आपल्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय सुरु आहेत.यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पिकविमाचा मोबदला मिळत नसल्याने सुरू असलेला संघर्ष आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मार्च महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेतात प्रचंड नुकसान झाले.यावेळी शेतकऱ्यांनी वेळेत पिकविमा कंपनींना नुकसान झाल्याचे कळवले मात्र अद्याप पावेतो शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही.याबाबत खासदार म्हणून डॉ हिना गावीतांकडून दखल घेणे अपेक्षित होतेखर म्हणजे मुळात शेतकऱ्यांचा वाली कोण राहिलेला नाही.
मार्च महिन्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते.डोळ्यादेखत शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिकांचे नुकसान झाले होते यात शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यावेळी महसूल विभागाने शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे केले होते.शासनाकडून शेतकऱ्यांना पिकविमा काढावा यासाठी सांगण्यात येत असते.शेतात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता.नुकसान झाल्याच्या ७२ तासाच्या आत पिकविमा कंपनीला ओनलाईन संपर्क साधावा लागतो.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याबाबत संपर्क साधला होता मात्र पिकविमा कंपनीचे कुठलेच अधिकारी शेताच्या बांदापर्यंत पोहचलेले नाहीत.
याबाबत खासदार डॉ हिना गावीत यांनी गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते.पिकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोवर तगादा लावून ठेवणे गरजेचे होते.शेतकरी जगला तरच देशाची आर्थिक सुधारेल याचा विचार करणे गरजचे आहे. मात्र मुळात शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिलेला नाही. आता लोकसभा निवडणूक सुरु आहे याबाबत शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनी संदर्भात खासदारांना प्रश्न विचारणे अपेक्षित आहे.देशात शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असेल तर यापेक्षा दुर्दैवी काय असेल.आता पुन्हा अचानक आलेल्या वादळी वारामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पहिलेच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी आता अपेक्षा सोडली आहे.