
बातमी कट्टा:- अंकलेश्वर बर्ह्राणपूर रस्त्यावर अनेकांचे जिव जात असतांना या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे वारंवार दिसुन आले आहे. खासदार म्हणून डॉ हिना गावीतांनी याकडे चार वर्षात गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित असतांना ऐन निवडणूकीच्या तोंडावर अंकलेश्वर बह्राणपूर महामार्ग संदर्भात मुद्दा डॉ हिना गावीत यांनी घेतला होता.मग इतक्या दिवस खासदार गावीतांनी का म्हणून याकडे दुर्लक्ष केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याला जोडणारा अंकलेश्वर बर्हाणपूर रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अनेकवेळा अपघाताला निमंत्रण दिले जाते.मुळात या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतांना खासदार हिना गावीतांनी मात्र सपशेल याकडे दुर्लक्ष केले होते. सर्वसामान्य जनतेचे खासदार असतांना या अशा गंभीर गोष्टींकडे का म्हणून खासदारंचे दुर्लक्ष होत होते ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
याबाबत शिरपूर येथील शिरपूर फर्स्ट च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आली.जिवघेना रस्त्यांसाठी या महामार्गालगत असलेल्या गावांमधून स्वाक्षऱ्या घेत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.तरुणांकडून याबाबत आवाज उठविण्यात आला.केंद्रात देखील भाजपच सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजपच महायुतीच सरकार असतांना रस्त्याच्या कामाला का म्हणून लक्ष देण्यात आल नाही ? आता निवडणूका सुरु झाल्या आहेत आता अनेक आश्वासन दिले जातील किंवा तुर्तास काम सुरु करण्यात येईल मात्र ऐ पब्लिक हे सब जानती है हे लक्षात असु देने देखील गरजेचे आहे.