बातमी कट्टा:- कार्यक्रमाला जात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली असून यात खासदार डॉ हिना गावित किरकोळ जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार शहरात एका कार्यक्रमाला जात असताना अचानक दुचाकीस्वार मध्ये आल्याने खासदार हिना गावित यांची गाडी झाडावर जाऊन धडकली. त्यामध्ये खासदार हिना गावित त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते आणि दुचाकीस्वार महिला जखमी झाले आहेत.अपघात झाल्यानंतर डॉ हिना गावीत यांना शहरातील तुलसी हॉस्पिटल येथे नेण्यात आले होतं मात्र त्यानंतर डॉक्टर हिना गावित यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील उपचार मुंबई येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

