बातमी कट्टा:- महिलेचा खून करून पसार झालेल्या संशयिताला २४ तासाच्या आत शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. काल दि १५ रोजी सकाळच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून महिलेसोबत राहणाऱ्या संशयिताने खून केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नीता वसंत गांगुर्डे रा.गोपाळनगर मागे जमनागिरी,धुळे या विनोद ऊर्फ बादल रामप्रसाद सोहिते( नाहार) रा.गोपाळनगर भिलटी जमनागिरी धुळे याच्यासोबत लग्न करण्यासाठी मार्च २०२० पासून घरातून निघून गेल्या होत्या. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नीता गांगुर्डे या संशयित बादल सोहिते (नाहार) सोबत राहत होती.बादलने दि १४ रोजी रात्री दहा ते दि १५ रोजी दहावाजे दरम्यान चारित्र्यावर संशय घेत बेदम मारहाण करुन नीता गांगुर्डे चा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बादल नाहार विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर संशयित बादल सोहिते(नाहार) हा फरार झाला होता.पोलीसांकडून त्याचा शोध सुरु असतांना धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,पोलीस उपनिरीक्षक दिपक धनवटे,पोना कुंदन पटाईत,पोकॉ निलेश पोतदार, मनिष सोनगीरे यांनी संशयित बादल सोहिते याला शिर्डी येथून ताब्यात घेतले.सदर गुन्ह्याचा तपास सपोनि दादासाहेब पाटील हे करीत असून कामकाजात पोहेकॉ मच्छिंद्र पाटील, विजय शिरसाठ, पोकॉ अविनाश कराड,प्रवीण पाटील, तुषार मोरे,शाकीर शेख,गुणवंत पाटील, प्रसाद वाघ,महेश मोरे,गौरव देवरे हे करीत असून २४ तासाच्या आत संशयिताला ताब्यात घेतले आहे.