बातमी कट्टा:- तरुणाच्या खूनाच्या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी रस्तारोको करत रोष व्यक्त केला घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनी भेट देत या बाबत दोंषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.खूनातील संशयितांना लवकरात लवकर शोधण्यासाठी 6 टिम करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील तरुण प्रेमसिंग गिरासे याचा चिमठाणे गावाजवळील सबस्टेशन जवळ अज्ञात संशयितांनी चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती.उपस्थितांनी प्रेमसिंग गिरासे यांना चिमठाणे रूग्णालयात दाखल केले मात्र तेथून धुळे येथील रूग्णालयात नेत असतांना प्रेमसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी पेट्रोल पंप वरील सि.सि.टी.व्ही फुटेज तपासणी सुरु केली होती.घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने धुळे दोंडाईचा रसत्यावर रास्तारोको आंदोलन करत रोष व्यक्त केला.पोलीस चौकी असतांना पोलीस थांबत नाहीत असा आरोप स्थानिकांनी केला.यावेळी घटनास्थळी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत दाखल होत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल व संशयितांना तात्काळ अटक केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,या घटनेतील खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी 6 टिम करण्यात आले आहेत.यात पोलीस स्टेशनच्या 3 टिम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टिम असा एकुण 6 टिम शोध घेत आहेत तर
काहींना संशयितांचे वर्णन देखील माहिती आहेत.त्या मदतीने देखील शोध घेऊन लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल व यापुढे चिमठाणे येथील चौकीत पुर्णवेळ पोलीस राहील असे सांगितले.