बातमी कट्टा:- शिरपूरात झालेल्या खूनाच्या घटनेनंतर भोई समाजाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांना निवेदन दिले असून यात खूनातील मुख्य संशयित हा पोलीसाचा आणि एलसिबीचा खबरी व पंटर असल्याने या गुन्ह्याचा तपास सिबीआयने करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की दि ४ रोजी सकाळी ६.३० वा.काही समाजकंटकांनी भोई समाजातील राहुल राजू भोई. २२, रा. शिंगावे, ता. शिरपूर जि. धुळे याचा धारदार हत्याराने भोसकून खून केला. राहुल भोई हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने, आज हा संपूर्ण परिवार उध्वस्त झालेला आहे. ही घटना समाजच्या नव्हे तर सर्वच स्तरातील समाजाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तरी घटनेचे सर्व तपास करून संशयितांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होईल याच पध्दतीने कार्यवाही करण्यात यावी. या खूनाच्या गुन्हातील मुख्य संशयित हा पोलिसाचा व एलसीबीचा खबरी व पंटर असल्या कारणाने पोलीस यावर कुठेतरी दया माया करण्याची दाट शक्यता आहे. वेळीच पोलीसांनी यास चाप लावला असता तर आज या तरुणाचा जिव गेला नसता. या सर्वांना त्यांच्या कर्माची फळे मिळालीच पाहिजेत व संशयिताला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी या खूनाचा तपास हा सीबीआय ने करावा असे समस्त भोई समाजाच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे.या निमित्ताने हा आक्रोश निवेदना मार्फत आपल्या पर्यंत घेऊन आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दि ४ रोजी खूनाच्या घटनेनंतर दोते पोलीसांनी ७ संशयितांना ताब्यात घेतले आहे.आमदार अमरिश पटेल यांनी देखील या खूनाच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली असून पोलीसांनी योग्य कार्यवाही करावाही करावी असे सांगितले आहे.


