
बातमी कट्टा:- पावणे सात लाखांची रोकड लुटीचा जवाई सासऱ्याचा प्लॅन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उधळला आहे. या प्रकरणात गंगाधरच शक्तीमान असल्याचे उघड झाले आहे.लुटीचा बनाव करुन सासऱ्याच्या मदतीने पावणे सात लाखांची रोकड गायब केली होती.मात्र पोलिस हिसका मिळताच सासराच्या मदतीने स्वताने रोकड चोरी केल्याचे संशयित जावयाने पोलिसांना सांगितले आहे.दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
एरंडोल कासोदा येथील व्यापारी विरेंद्र भोई यांनी नेहमीप्रमाणे कापूस विक्रीसाठी एम.एच १९ झेड ५२०३ क्रमांकाचा आयशर भरला आणि जिनींग मध्ये विक्रीसाठी पाठवला या आयशरचा चालक रवींद्र सोनवणे याने जिनींग मध्ये कापूस विक्री करुन ६ लाख 83 हजारांची रोकड घेऊन परत येत असतांना नरडाणा पोलिस स्टेशन हद्दीत होळ गावा जवळ चालक रवींद्र सोनवणे याने व्यापारी विरेंद्र भोई यांना फोन केला व दोन अज्ञातांनी मोटरसायकलीवर येऊन काचेवर दगडफेक करत पावणे सात लाखांची रोकड नेल्याचे सांगितले. घटनेनंतर व्यापारी विरेंद्र भोई घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करुन नरडाणा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल केला.
व्हिडीओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/OAq6WH4_CU0?si=Tt7HmkZgaU61l68c
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चालक रवींद्र सोनवणे सांगत असलेल्या घटनाक्रमांमध्ये विसंगती दिसून आल्याने संशय आला.पथकाने चालकाला ताब्यात घेत पोलिस हिसका दाखवल्यानंतर चालक रवींद्र सोनवणे रा.आडगाव जळगाव याने सासरा मोहन निंबा महाजन रा.एरंडोल यांच्या मदतीने बनाव केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ चालक रवींद्र सोनवणे व त्याचा सासरा मोहन महाजन यांना ताब्यात घेतले त्यांच्या कडील पावणे सात लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.या रोकड परत मिळाल्याने व्यापारीने मोकळा श्वास घेतला.
बघा व्हिडीओ वृत्तांत लिंक क्लिक करा https://youtu.be/OAq6WH4_CU0?si=Tt7HmkZgaU61l68c
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे,कैलास दामोदर,संजय पाटील,संतोष हिरे,योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी,हेमंत बोरसे,चेतन बोरसे,संदीप सरग,संदीप पाटील,तुषार सुर्यवंशी,प्रल्हाद वाघ,देवेंद्र ठाकूर,जगदीश सुर्यवंशी,कैलास महाजन आदींनी केली आहे.