
बातमी कट्टा:- गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे येथे घडली आहे.गणपती बुडवतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा भावांचा मृत्यू झाला.यारदम्यान त्यांच्या सोबतचा मित्र बचावला आहे.
धुळे शहरातील बिलाडी परिसरामध्ये असलेल्या वारे नगर ओम पाटील व यश पाटील हे दोघे सख्खे भाऊ आपल्या मित्रासोबत गणपती बुडवण्यासाठी ते परिसरातील तलावात गेले यावेळी तलावातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य करण्यात आले, परंतु या तिघांपैकी एकाला वाचविण्यात परिसरातील नागरिकांना यश आले आहे.यादरम्यान दोघा सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या दोघांचे पार्थिव शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.