बातमी कट्टा:-29 वर्षीय तरुणाने साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि 18 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहराजवळील करवंद रोडवरील महाविर लॉन्स जवळ राहणाऱ्या चंद्रकांत रवींद्र माळी उर्फ सोनु वय 29 याने घरी कोणी नसतांना राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि.18 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करत चंद्रकांत माळी याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून चंद्रकांत माळी यास मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींनी गर्दी केली होती. तो विवाहित होता त्याच्या पश्चात पत्नी ,आई ,वडील,बहिन व भाऊ होत.