बातमी कट्टा:- रात्रंदिवस कष्ट घेऊन ऊस पिक उभे केले होते.ऊसाच्या उत्पन्नातून कर्ज फेडले जाईल या आशेत असतांनाच ऊसाच्या क्षेत्राला आग लागल्याने ऊस जळून खाक झाला.त्यात बँकेतील कर्जाचे डोंगर या विवंचनेतून तरूण शेतकऱ्याने जिवनप्रवास संपवल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील हिमंत रामसिंग गिरासे या 34 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा तीन एकारातील ऊस जळून खाक झाला होता. हिंमत गिरासे यांच्यावर बँकसह खाजगी कर्जाचा डोंगर होता. ऊसाच्या उत्पन्नातून काही कर्ज फेडले जाईल अशी त्यांना अपेक्षा असतांनाच ऊस जळून खाक झाला.यामुळे शेतकरी हिमत गिरासे चिंतेत होते.शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हिंमत गिरासे यांनी स्वताच्या शेतात झाडाला गळफास घेऊन जिवनयात्रा संपवल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.हिंमत गिरासे यांच्या पश्चात आई वडील,पत्नी लहान भाऊ,मुलगी असा परिवार आहे.