गळ्यातील चैन हिसकावून पसार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून फरार होणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.दोन्ही संशयित कल्याण येथील असून त्यांच्या ताब्यातून 70 ग्रँम वजनाची 3 लाख 50 हजार किंमतीची सोन्याची चैन मिळुन आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 15 मार्च रोजी पहाटे 5:30 ते 6:30 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील ललित मोतीलाल लोढा हे मॉर्निंगवॉक करत असतांना दोन अज्ञात संशयितांनी मोटरसायकलीवर येऊन गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पसार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि 25 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गैपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे धुळे शहरातील राष्ट्रीय क्रमांक 3 वरील चाळीसगाव चौफुली येथे दोन संशयित पाठला बॅग लावून उभे होते.पोलीसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवउडवीचे उत्तरे दिली.पोलीसांनी अधिक चौकशी केली असता दोघांनी आपले नाव असु शाजमाल सैयद व महोम्मद अनु सैय्यद दोन्ही रा.आंबेवली कल्याण असे सांगितले.त्यांच्या कडील बॅगेची झडती घेतली असता त्यात 70 ग्रँम वजनाची 3 लाख 50 हजार किंमतीची सोन्याची रस्सी चैन मिळुन आली. दि 15 रोजी मॉर्निंगवॉक करणाऱ्या इसमाच्या गळ्यातील चैन हिसकावून पोबारा केला.यावेळी फिरोज सैय्यद व शोएब सैय्यद यांच्या सोबत असल्याचे कबुली त्यांनी दिली आहे. दोन्ही संशयित सराईत असून यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडे होतील का ? या बाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि प्रकाश पाटील, योगेश राऊत,पोसई बाळासाहेब सुर्यवंशी,संजय पाटील, प्रकाश सोनार,संदीप सरग,कुणाल पानपाटील,उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, श्रीशैल जाधव,अमोल जाधव,महेंद्र सपकाळ आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: