बातमी कट्टा:- गौण खनीजाचा परवाना नसतांना अवैध गाळ मातीची वाहतूक होत असतांना शिरपूर येथील नायब तहसीलदार यांच्या पथकाने कारवाई करत एक जेसीबी मशीन व ट्रॅक्टर जप्त केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे सुभाष कुंभार यांच्या मालकीचे एम एच 18 झेड 2903 क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि एम एच 19 ए एन1808 क्रमांकाचे जेसीबी अवैध गाळ माती वाहतूक करत असतांना तहसिल कार्यालय शिरपूर यांचे पथकाने कारवाई केली असता वाहन मालक यांच्याकडे कोणताही गौण खनिज परवाना नसल्याने तसेच खाजगी गटातून जेसीबी द्वारे वाहतूक करत असल्याने सदरचे ट्रॅक्टर व जेसीबी तहसिल कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आले आहे. सदरची.कारवाई उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रमोद भामरे व तहसिलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार अधिकार पेंढारकर ,मंडळ अधिकारी ढोले मंडळ अधिकारी भामरे,वाघ तलाठी सोनवणे,तलाठी दिनेश गुसिंगे, तलाठी नागलोद ,तलाठी भावसार एस पी पाटोळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.