बातमी कट्टा:- आज दि 7 रोजी सकाळी 6 वाजेपासून थाळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि उमेश बोरसे यांनी थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनवुन स्वतः अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू केली.या मोहिमेत जवळपास १ लाख ,२२ हजार किमतीची गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्दवस्त करण्यात आले असून मुद्देमालाचासुद्धा नाश करण्यात आलेला आहे. मात्र आरोपी हे पोलिस रेड आल्याचे पाहून पळून गेलेले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील असली गावाच्या शिवारातील मोठा नाला या परिसरात झाडाझुडपांच्या आडोशाला छापा टाकाला यावेळी संशयित राजेश उर्फ मंड्या ज्ञानेश्वर कोळी वय-२५ रा.असली, याच्या ताब्यात मिळून आलेला गावठी दारू व ती बनविण्याची साधने व कच्चा माल असा एकूण २६,१००/- रु.मुद्देमाल, संशयित नाना गुलचंद भिल,वय-४०,रा.असली, याच्या ताब्यात मिळून आलेला गावठी दारू व ती बनविण्याची साधने व कच्चा माल असा एकूण २६,१००/- रु. मुद्देमाल,संशयित अभिमन उर्फ आबा हिरामण भिल, वय-२८,रा.असली याच्या ताब्यात मिळून आलेला गावठी दारू व ती बनविण्याची साधने व कच्चा माल असा ३१,८००/- रु. मुद्देमाल,संशयित मगन उखडू वंजारी, वय-३५, रा.असली याच्या ताब्यात मिळून आलेला गावठी दारू व ती बनविण्याची साधने व कच्चा माल असा ३७,७५०/- रु. मुद्देमाल असा एकुण 1 लाख 22 हजारानचा मुद्देमालांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सदरची कारवाई थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलीस हवलदार दिलीप कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पिसे, पोलीस कॉन्स्टेबल सिराज खाटीक यांच्या पथकाने केली आहे.