गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला पोलीसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

बातमी कट्टा: दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केला आहे.

On youtube

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील हाजी नगर परिसरात राहणारा मोहम्मद शाहिद रियाज अहमद हा दहशत वाजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.शोध सुरु असतांना धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली जवळील एका लॉज जवळ मोहम्मद अहमद हा आढळून आला त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केली आहे.या बाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: