बातमी कट्टा:- गॅस गळतीचा आंदाज न आल्याने शेगडी पेटवताच अचानक आगीचा भडका उडून आगीत भाजल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.दि 29 रोजी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील वनावल येथील दिनेश साहेबराव लांडगे हे बालकल्याण विभागात नोकरीला असल्याने ते आपल्या कुटुंबासोबत धुळे शहरातील देवपूर भागातील आनंद नगर परिसरात वास्तव्यास होते.काल दि 29 रोजी दिनेश लांडगे यांची पत्नी भारती दिनेश लांडगे या दुपारी स्वयंपाक खोलीत गेले तेथे गॅस गळतीचा आंदाज न आल्याने भारती लांडगे यांनी शेगडीला पेटवताच आगीने भडका घेतला.आग संपूर्ण खोलीत पसरली तर भारती लांडगे या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पसरताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग विझवत भारती लांगडे यांना हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल केले मात्र भाजल्याने भारती लांडगे यांचा मृत्यू झाला. भारती लांडगे यांचे शिरपूर तालुक्यातील तर्हाडी येथील माहेर असून त्यांना 12 वर्षाची मुलगी व 6 महिन्याचा मुलगा होत.याबाबत पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.