गोणपाटात आढळून आला महिलेचा मृतदेह,

बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहारात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दिराने वहिनीचा गळा आवळून हत्या करत मित्राच्या मदतीने गोणपाटात मृतदेह भरुन शहराबाहेर निर्जनस्थळी मृतदेह खड्ड्यात फेकल्याचे समोर आले आहे.घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/zkiHbcX4Qxc?si=6sHAvADTSgE01Xke

व्हिडिओ वृतांतसाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/zkiHbcX4Qxc?si=6sHAvADTSgE01Xke

नवापूर शहरातील आदर्श नगर भागात राहणारे रुक्सना आसिफ खाटीक या बेपत्ता असल्याची तक्रार पती आसिफ खाटीक याने नवापूर पोलिस स्टेशनला दिली होती. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असतांनाच नवापूर शहराबाहेर करंजी रस्त्यावर निर्जनस्थळी गोणपाटात रुक्सना आसिफ खाटीक या बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला.या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली‌. रुक्सना आसिफ खाटीक या महिलेची हत्या कोणी व का केली आणि मृतदेह गोणपाटात टाकून घरापासून इतक्या लांब अंतरावर कोणी टाकला याबाबत शोध सुरु होता.

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/zkiHbcX4Qxc?si=6sHAvADTSgE01Xke

पोलिसांनी तात्काळ रुक्सना आसिफ खाटीक यांच्या घराजवळ व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा शोध घेतला यावेळी त्या सीसीटीव्ही कॅमेरात एक चारचाकी वाहन परत परत घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आले.त्या कार मध्ये मयत रुक्सना आसिफ खाटीक यांचा दिर तौसिफ छोटू खाटीक वय 32 व त्याचा साथीदार संतोष बाला गावित वय 39 हे दिसून आले.

व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/zkiHbcX4Qxc?si=6sHAvADTSgE01Xke

पोलिसांनी तौसिफ खाटीक व संतोष गावित या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली.त्यानंतर मयत रुक्सना खाटीक या महिलेच्या हत्येचे प्राथमिक कारण उघड झाले.
मयत रुक्सना खाटीक या महिलेने परिवारातील घरगुती वादाची तक्रार धुळे येथील जमातीच्या वरिष्ठांकडे केली होती.याबाबतचा राग मनात धरून दिर तौसिफ छोटू खाटीक वय 32 याने गळा आवळून हत्या करत त्याचा साथीदार संतोष बाला गावित वय 39 याच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत गोणपाटात टाकून ते निर्जनस्थळी फेकल्याचे उघड झाले.पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरु आहे.

व्हिडिओ वृतांतसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/zkiHbcX4Qxc?si=6sHAvADTSgE01Xke

या घटनेनंतर जिल्ह्यातील खाटीक समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून प्रकरणाचे सखोल चौकशी करून यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: