बातमी कट्टा:- वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे धुळ्याकडून शहरात एकच खळबळ उडाली आहे.पैशांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीसांनी याप्रकरणी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन संशयिताना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्य होता.
रात्री घरी तो नसताना त्याच्या घरी दोन ते तीन जण येऊन त्याच्या पत्नीला तो कोठे आहे याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर ते दोघेही दुचाकी वरून निघून गेले, काही वेळानंतर चिनू पोपली घराजवळ आल्यानंतर दोघेजण परत आले व त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला या वादातच त्यांनी पिस्तूल काढून चिनू पोपली याच्यावर गोळीबार केला.गोळीबार नंतर जखमी अवस्थेत चिनू हा घरी आला व त्याने आपल्या पत्नीला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.