बातमी कट्टा:- ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप तोडून रेकॉर्ड रूममधील कपाटात ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रे व.फाईली जाळल्यची घटना दि २ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत उशिरापर्यंत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शिरपूर तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात दि १ रोजी रात्री १० ते दि.२ रोजी सकाळी ६.वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून रेकॉर्ड रूम मधील कपाटात ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रे व फायली जाळून टाकल्याची घटना घडली आहे.याबाबत सकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाच्या खोलीतून धूर निघू लागल्याने ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने लागलीच त्यांनी घटनेची माहिती सरपंच कनीलाल पावरा यांना दिली.माहिती मिळताच सरपंच व ग्रामसेवक, कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी दाखल होत.घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
ग्रामपंचायतीच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रेकॉर्ड रुम मधील कागदपत्रांना नेमकी कोणी आग लावली.यामागे नेमका कोणाचा हात आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे.