बातमी कट्टा:- ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दुषीत पाणीपुरवठ्यावरुन वाद होत दांगडो झाला.19 महिन्यानंतर झालेल्या ग्रामसभेत वाद निर्माण झाला होता.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन सौम्य लाठीचार्ज करत गर्दीवर नियंत्रण मिळवले.
धुळे जिल्हातील कापडणे येथील ग्रामपंचायतीत 19 महिन्यानंतर काल दि 19 रोजी ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सुरु झालेल्या या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि रोजगार सेवक याविषयावर चर्चा होणार होती.मात्र ती चर्चेवर कुठलाही प्रकारे तोडगा न निघता ग्रामसभेत विविध विषयांवर प्रश्न उपस्थित होत वाद विवाद होण्यास सुरुवात झाली.कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत प्रचंड गर्दी ग्रामसभेत बघावयास मिळाली होती.
ग्रामसभेत दुषित पाणीपुरवठा होत असल्याने लोकांनी प्रश्न उपस्थित केले यावरून ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला.गर्दीत हा वाद मोठा झाला होता. गोंंधळजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दाखल झाले. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करुन गर्दीवर नियंत्रण मिळवले.ग्रामसभेत वाद उसळल्याने ग्रामसभा गुंडाळण्यात आली होती.