- बातमी कट्टा: घरकुल मंजूर झालेत, या वर्षाच्या जोरदार पावसाळ्यात घर जिर्ण व पडके झालेत, मंजूर घरकुल यादीत नाव शेवटी आलेत, आता घरकुल धनादेशाची वाट पाहत जिर्ण झालेल्या धोकेदायक घरात राहण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था शिरपूर तालुक्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांची झाली आहे. यासाठी शिरपूर तालुका सरपंच महासंघाच्या शिष्ठमंडळाने बिडीओंची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील सरपंचांनी आपापल्या गावातील घरकुल संदर्भातील व्यथा मांडल्या.
शिरपूर तालुक्यात घरकुल ‘ड’ यादीतील मंजूर लाभार्थ्यांना आरक्षण वर्गवारी प्रमाणे लाभ मिळणे चालू झालेआहे. मंजूर घरकुल लाभार्थ्यांचा पहिल्या टप्प्यात अनु. जाती जमाती/एनटी/ओबीसी ई. ना आरक्षण वर्गवारी प्रमाणे धनादेश मिळाला. परंतु अपंग बांधवाना आरक्षण वर्गवारी प्रमाणे लाभ मिळत नाहीय. घरकुल मंजूर झालेत पण प्रतीक्षा यादीत नाव शेवटी आहे अशा अपंग बांधवांना इतरांना मिळणाऱ्या आरक्षण वर्गवारी प्रमाणे प्राधान्याने घरकुल धनादेश द्यावा तसेच या वर्षाच्या पावसाळ्यात ज्या मंजूर लाभार्थ्यांचे घर पाण्यामुळे पडके झालेत अशा लाभार्थ्यांनाप्राधान्याने धनादेश द्यावा, जरी घरकुल मंजूर यादीत त्यांचे नाव शेवटी असतील परंतु आजच्या घडीला त्यांना राहण्यासाठी घर नाहीत व धोकेदायक जिर्ण घरात वास्तव्यास आहेत अशा लाभार्थ्यांचा प्रतक्ष गावात सर्वे करून जिर्ण व पडके झालेल्या घरांना (ज्यांचे घरकुल मंजूर आहेतअशा लाभार्थ्यांना) प्राधान्य क्रमाने घरकुल धनादेश द्यावा या मुख्य मागणी साठी शिरपूर तालुका सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच महासंघ तर्फे गट विकास अधिकारी एस टी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
एस.बी.एम. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढिव कुटूबांना मागील एक ते दिड वर्षापासून लाभ देण्यात आला नाही, त्यांना लाभ देण्यात यावा व घरकुल यादीतील अल्पसंख्याकांना प्राधान्य देण्यात यावे व त्यांचे वेगळे उद्दीष्ट द्यावे असा मुद्दा भाटपुरा उपसरपंच तथा सरपंच महासंघ कार्याध्यक्ष रोशन सोनवणे यांनी मांडला. अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत यांनी काही मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे जिओ टॅगिंग होत नसल्यामुळे घरकुल बांधकामास प्रारंभ होत नसल्याचे निदर्शनास आणले.
यावेळी शिरपूर तालुका सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष रोषन सोनवणे, उंटावद सरपंच राजकपूर मराठे, अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत, अर्थे सरपंच साहेबराव दगा पाटील, कोषाध्यक तथा सावेर सरपंच नाना वाघ, हिंगोणी सरपंच सोमा भिल, तालुका संपर्क प्रमुख तथा शिंगावे उपसरपंच चंद्रकांत उर्फ भुरा पाटील, बाळदे ग्रा पं सदस्य राजू पाटील उपस्थित होते.