
बातमी कट्टा :- पंचायय समिती सदस्य, महिला उपसरपंचासह एकुण 15 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकुल मंजूरीच्या वादातून दोन गटात हा वाद होत हाणामारी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सदरची घटना घडली आहे.वामन कोळी वय 55 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,घरकुल योजनेबाबत चर्चा करीत असल्याचा राग आल्याने संशयित पंचायत समिती सदस्य विजय बागूल,पंकज बागूल,अनिता बागूल,वर्षा बागूल,संतोष बागूलकैलास बागूल, वैजयंता बागूल व पंकज कोळी सर्व रा.थाळनेर यांनी चाकूने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले तर याच प्रकरणात संतोष बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले संशयित उपसरपंच आशाबाई कोळी,प्रशांत कोळी,वामन कोळी,पुनम कोळी, रंजना कोळी,वर्षा कोळी आदींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी पंचायय समिती सदस्य, महिला उपसरपंचासह एकुण 15 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
