बातमी कट्टा:- घरगुती क्लासमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय विद्यार्थिनीला चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील करवंद गावात रविवारी सकाळी घडली असून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील करवंद घरगुती क्लास असून रविवारी सकाळच्या सुमारास क्लास सुरू असताना गावातील 15 वर्षीय विद्यार्थीनीला क्लास मध्येच अचानक चक्कर आल्याने खाली कोसळून पडली.क्लास टिचरांनी सदर विद्यार्थिनीला तात्काळ उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डॉ.कदम यांनी सकाळी 11: 40 वाजेच्या सुमारास तपासणी करून सदर विद्यार्थिनीला मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील यांनी खबर दिल्याने शहर पोलीस ठाण्यातील पीएसआय किरण बा-हे,मनोहर पिंपळे, मनोज साठे,भूषण कोळी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली दरम्यान सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तीन डॉक्टरांच्या पॅनल मार्फत उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोना पंकज पाटील करीत आहे.