घरगुती सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात…

बातमी कट्टा :- घरगुती गॅस सिलेंडर मधून इलेक्ट्रीक मोटारीच्या मदतीने अवैधरित्या पध्दतीने वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या दोघांवर शिरपूर शहर पोलीसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ११ सिलेंडर व दोन इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गोपणीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलीसांनी दि ३ रोजी सायंकाळी शिरपूर शहराजवळील भाऊ हॉटेल समोरील साई डिजिटल समर्थ ऑईल नावाच्या टत्रटी दुकान येथे गणेश मोहन माळी वय २४ व दिनेश राजेंद्र माळी वय ३१ रा.वरवाडे हे दोन्ही गैरकायदेशीर रित्या घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस इलेक्ट्रीक मोटारीच्या सहाय्याने वाहनांमध्ये भरण्यासाठी वापर करीत असतांना एकुण ४२ हजार रूपये किंमतीचे एकुण ११ घरगुती सिलेंडर ,२ इलेक्ट्रीक मोटार,२ वजनकाटे अशांसह मिळुन आले.दोघांवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, शोध पथकाचे ललित पाटील,मनोज पाटील,गोविंद कोळी, विनोद अखडमल प्रशांत पवार आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: