बातमी कट्टा:- शहरातील गजबजलेल्या परिसरातील शेतकऱ्याच्या बंद घरात चोरांनी डल्ला मारत सोने चांदीसह रोकड चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या बाबत पोलीस स्टेशनात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दोंडाईचा शहरातील गबाजी नगरमध्ये राहणारे श्री गिरधारीलाल रमेश भामरे वय (४०) वर्ष हे दि. २६ जुन २०२१ शनिवार रोजी सकाळी ९.०० वाजता घराच्या दोन्ही दरवाज्यांना कुलूप लावून, खाजगी वाहनाने पुर्ण परिवारसह नांदगाव ता.जि.नाशिक येथे लग्न समारंभनिमित्त गेले होते.तसेच तेथुन दुसऱ्या दिवशी कळवण येथून मुक्काम नंतर दि.२७ जुन २०२१ रात्री ९.०० वाजेच्या सुमारास गिरीधारीलाल भामरे दोंडाईचा येथील गबाजी नगरमधील घरी पोहचले. तेव्हा ते गेटचे कुलूप उघडून आत गेले असता घराच्या लाकडी दरवाज्याचे कुलूप खाली तोडलेल्या अवस्थेत होते.

घरात प्रवेश केला असता,बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटून, सामान अस्तव्यस्त पडलेला दिसला.त्यावेळी कपाटातील 40 हजार रूपये किमंतीचे एक चार तोळे वजनाची सोन्याची मंगळपोत,20 हजार रुपये किमंतीचे एक दोन तोळे वजनाचा नेकलेस, 4 हजार रुपये किमंतीचे आठ ग्रँम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल,पंधरा हजार रुपये किमंतीचे तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, पाच हजार रुपये किमंतीचे एक तोळे वजनाची सोन्याची चेन,व स्वयंपाक घरात स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले वीस हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 4 हजार रुपये किमंतीचा सोन्या-चांदीच्या दागिंन्यासह रोकड चोरी झाल्याची तक्रार दोंडाईचा पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे.घटनास्थळी पोलीसांकडुन चौकशी सुरु आहे.
