
बातमी कट्टा:- घरफोडी करणाऱ्या सराईत संशयिताला शिरपूर शहर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून एक लाख 25 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुवे येथे दि 26 व 27 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घरफोडी झाली होती.घरातील मागच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून कपाटातील 2 लाख 50 हजार किंमतीचे रोकड चोरी झाली होती.याबाबत तपास सुरु होता.
पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.की किरतलिया शिवराम तडवी रा.श्रीराम फलीया मोहाला ता.शेंधवा जि.बडवाणी व जतन रुमसिंग मोरे रा.मोहल्ला ता.शेधवा यांच्या शोधार्थ शहर पोलीस स्टेशनचे पथक रवाना केले असता पोलीसांनी सापळा रचून संशयित जतन रुमसिंग मोरे वय 23 याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता 10 हजाराची रोकड,40 हजार किंमतीचे सोन्याचे टोंगल,25 हजार किंमतीचे अंगठ्या,50 हजार किंमतीचे सोन्याची चैन जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख ,यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक गणेश कुटे,शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,गोविंद कोळी,विनोद अखडमलप्रविण गोसावी,मुकेश पावरा,मनोज दाभाडे व प्रशांत पवार आणि होमगार्ड गोपाल अहिरे आदींनी केली आहे.