
बातमी कट्टा:- गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असतांना घरातच कत्तलखाना चालवणाऱ्या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.घरात मांस विक्री करतांना पोलीसांनी कारवाई करत 35 किलो 500 ग्रँम वजनाचे मांस,कत्तलीची औजारे,व ईतर साहित्य जप्त केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील कुरेशी मोहल्ला भागातील जका घरात पोलीसांनी कारवाई करत 35 किलो वजनाचे मांस जप्त करत दोघांवर कारवाई केली आहे. नरडाणा पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे नरडाणा पोलीस स्टेशनचे पथक दि 26 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बेटावद गावातील कुरेशी मेहल्ला येथील एका घरात छापा टाकला.यावेळी घरात मोठ्या प्रमाणात प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी काढून ठेवल्याचे दिसून आले.यावेळी पोलीसांनी 35 किलो 500 ग्रँ वजनाचे मांस,कत्तलीची औजारे,फ्रीज,वजनकाटा असा एकुण 12 हजारांचा माल जप्त करण्यात आला.यावेळी पोलीसांनी सलीम बुढन कुरेशी व सलाम समद कुरेशी या दोघांना अटक केली आहे.
सदर जप्त केलेले मांस नेमके कोणते याबाबत माहिती मिळु शकलेली नाही. पोलीसांशी घटनास्थळाचा पंचानामा करुन मांसचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. दोघांविरुध्द नरडाणा पोलीस सँटेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.