
बातमी कट्टा:- घरातून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि १३ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गावकरी व नातेवाईकांची गर्दी होती.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील संजय पाटील हे शिरपूर येथील अरिहंत नगर नगर येथे कुटूंबासोबत राहतात त्यांचा २१ वर्षीय एकुलता एक मुलगा साईराज संजय पाटील हा दि ११ रोजी सकाळी घरातून बाहेर जात असल्याचे सांगत बेपत्ता झाला होता.दोन दिवसांपासून त्याचा सर्वत्र शोध सुरु असतांना आज दि १३ रोजी सावळदे तापी नदीपात्रात साईराज ताचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत मदतकार्य करत साईराज याचा मृतदेह बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.साईराज घरातील एकुलता एक होता त्याच्या पश्चात आई वडील आणि बहिण असा परिवार होत.