बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे घरात कापसाच्या ढिगाऱ्या जवळ खेळत असतांना घरातील एकुलता एक 10 वर्षीय मुलाचा कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे दुपारी घरातील सर्व सदस्य शेतात गेलेले असतांना दहा वर्षीय चिमुकला कृष्णा योगेश पाटील हा घरात एकटाच होता.तो दुपारच्या सुमारास घरात असलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर खेळत होता.खेळत असतांना ढिगाऱ्यातील खड्डयात कृष्णा पडल्याने कृष्णाचे खाली डोके वरती पाय झाले. त्याला त्या परिस्थितीत बाहेर निघणे शक्य झाले नाही. डोके खाली गेल्याने आवाज देणे देखील शक्य झाले नाही.घरात व अवतीभवती कोणीही उपस्थित नसल्याने कृष्णाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली मात्र त्यावेळेस कृष्णाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला.कृष्णा हा घरातील एकुलता एक मुलगा होता.