
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/fEah84uRc0w?si=rbgAGNu9NzBlKYxz
बातमी कट्टा:- घरातील सदस्य घरात झोपलेले असतांना घरातील कपाटातील असलेले लाखोंच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज दि १८ रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. यासोबतच आणखी दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे.घटनेनंतर शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पथक,स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/fEah84uRc0w?si=rbgAGNu9NzBlKYxz

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील जातोडे गावात भरवस्तीत तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे.जातोडे गावतील काही भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने उमेश नानाभाऊ राजपूत यांच्या वडीलांनी घरातील पुढचा दरवाजा उघडा ठेवून कुटूंब झोपले होते.घरात पहाटे उठून बघितले तर कपाटातील लाखोंचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली यात सहा तोळ्याचे दागिने चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लिंक क्लिक करा https://youtu.be/fEah84uRc0w?si=rbgAGNu9NzBlKYxz

यानंतर घटनास्थळी शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शोध पथकाने धाव घेतली यावेळी विचारपूस केली असता यासोबतच आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले मात्र दोन्ही ठिकाणी काही एक वस्तू त्यांच्या हाती लागलेली नाही. मात्र उमेश राजपूत यांच्या घरातून लाखोंचे दागिने त्यांनी लंपास केले आहेत.
On YouTube https://youtu.be/fEah84uRc0w?si=rbgAGNu9NzBlKYxz
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते.यावेळी त्यांच्याकडून देखील घटनेची चौकशी करण्यात आली.श्वान पथकाने गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्यापर्यंत मागोवा काढला होता व ठस्से तज्ञांकडून चोरी झालेल्या ठिकाणी ठस्से घेण्यात आले आहे. या चोरीच्या घटनेमुळे जातोडे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी दुपारी उशीरापर्यंत गुन्हा दाखलचे काम सुरु होते.
https://youtu.be/fEah84uRc0w?si=rbgAGNu9NzBlKYxz