बातमी कट्टा:- राहत्या घरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल दि २३ रोजी सायंकाळी घडली असून तरुणाच्यावर मारहाण झाल्याचा खूणा आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील वाल्मिक नगर येथे राहणाऱ्या राजु सुदाम कुवर ( कोळी) वय 32 याचा दि 23 रोजी सायंकाळी राहत्या घरी मृतदेह आढळून आला.यावेळी मयत राजु कोळी याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा असून काना रक्तश्राव झाल्याचे दिसून आले.यावेळी भाऊ दिलीप सुदाम कोळी याने मयत अवस्थेत राजु कोळी याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.राजु कोळी सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पोलीस दाखल झाले होते.अधिकची चौकशी सुरु असून शवविच्छेदनानंतर घटनेचा उलगडा होण्यास अधिक मदत होणार आहे.