
बातमी कट्टा:- कुरखळी गावात एकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि १६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले असून मृत व्यक्तीच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कळते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावातील श्रावण काशिनाथ धनगर या ४३ वर्षी व्यक्तीचा आज दि १६ रोजी सायंकाळी राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पाटील ग्रामस्थांनी धाव घेतली यावेळी श्रावण धनगर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी भागवत सोनवणे थाळनेर पोलिस स्टेशनचे बाळासाहेब थोरात यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले.यावेळी श्रावण धनगर यांच्या कानाखाली रक्तस्राव झाल्याचे आढळून आले.

मयत श्रावण धनगर यांचा मृतदेह तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.पोलिसांनी श्रावण धनगर यांची पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कळते. तीन महिन्यांपूर्वी श्रावण धनगर यांच्या एकुलता एक मुलाने सावळदे तापी नदी पात्रात आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर पोलिसांकडून अधीकची कार्यवाही सुरु आहे.
