घरासमोर भीक मागणाऱ्या भिक्षुकाचा खून…

बातमी कट्टा:- घरासमोर येऊन भीक मागितल्याचा राग आल्याने भिक्षुकाला मारहाण करत खून केल्याची घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी नाकाबंदी करत संशयिताला ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुक्यातील होळनांथे परिसरातील अमरीश पटेल नगर या वस्तीतील चैन्या आरश्या पावरा वय 55 हे अविवाहित असून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतात.दि 6 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चैन्या पावरा हे अमरीशनगरमधील राहणाऱ्या कालू गणपत पावरा याच्या घरी भीक मागण्यासाठी गेले होते.भीक मांगत असल्याचा राग आल्याने कालू पावरा याने लाकडी काठीने चैन्या पावरा याला मारहाण केली.तोंडावर व डोक्यावर वार केल्याने चैन्या पावरा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळले. कालू पावरा याने चैन्या पावरा यांना बेशुद्धावस्थेत ओढत नेत भाईदास भिल यांच्या घराशेजारी असलेल्या गटारीजवळ सोडले.चैन्या पावरा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेला असल्याची माहिती मयत चैन्या पावरा याचा भाऊ रामसिंह पावरा याला मिळाल्यानंतर घटनास्थळी रामसिंह पावरा व त्यांचे जवाई गेले.तेथे चैन्या पावरा बेशुद्धावस्थेत असतांना याच्या नकातोंडातून रक्त निघाल्याचे दिसले.तपासले असता चैन्या पावरा मयत झाल्याचे आढळले.

याबाबत रामसिंह पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीसस्टेशनात कालू गणपत पावरा याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खूनाची माहिती थाळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत संशयित काळू पावरा वय 30 याला ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: