
बातमी कट्टा:- मतदार यादीत चुकीचे नाव नमुद झाल्याने मतदार यादीत नाव दुरुस्ती करण्यासाठी दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र करण्याकरीता प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी 100 रूपयांची लाच स्विकारतांना तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन यांना लाचलुचपत विभाग धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वरसुस येथील तक्रारदार यांच्या आईचे नाव मतदार यादीत चुकीचे नमुद झाल्याने तक्रारदार यांचे आईस मतदान करण्यास तसेच निवडणूकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी मतदार यादीत आईचे नाव दुरुस्त करण्यासाठी दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबत 100/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्याकरिता तक्रारदार यांनी आज दि 8 रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथे गेले असता तेथे हजर असलेले अव्वल कारकुन गणेश पिंगळे यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे 100 /- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे दुरध्वनी द्वारे माहिती दिली होती.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिंदखेडा येथे तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवून आज दि 8 रोजी पडताळणी केली असता अवल कारकून गणेश पिंगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे 100/- रूपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना गणेश पिंपगळे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या विरुध्द शिंदखेडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पो.निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम,शरद काटके,कैलास जोहरे,भुषण खलाणेकर,भुषण शेटे,गायत्री पाटील, संदीप कदम ,संतोष पावरा,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
