चारा घेऊन जाणारा ट्रक आगीत जळून खाक

बातमी कट्टा:- अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासोबतच अवकाळी पावसामुळे चाऱ्याचे नुकसान झाले आहे. गुरांना वेळेवर चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी चारा साठवून ठेवत आहेत. आणि अशातच चारा भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने संपूर्ण चारासह ट्रक जळून खाक झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नवापूर तालुक्यातील खोकरवाडा गावात चाराने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली.ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.या आगीत लाखो रुपयांचा चारासह ट्रक जळून खाक झाला आहे.

अचानक आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरु करत संपूर्ण आग विझविण्यात आली.मात्र तोवर ट्रक जळून खाक झाली यात ट्रक मालकासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊसानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने  चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जनावरांसाठी चारा साठवणूक करून ठेवत आहे मात्र अचानक लागलेल्या या आगी मूळे शेतकऱ्याचे लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.

WhatsApp
Follow by Email
error: