बातमी कट्टा:- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपुर तालुक्यातील पळासनेर जवळ 10 मार्च रोजी रात्री सेंधवा कडे जाणाऱ्या एका कंटेनरला शॉर्टसर्किट अचानक आग लागल्याची घटना घडली असून घटनास्थळी नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली.

10 मार्च 2022 रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास शिरपुर कडून सेंधवा कडे एच आर 38 डब्लूएस 5129 क्रमांकाचे कंटेनर पळासनेर जवळ माध्यमिक शाळेच्या पाठीमागे महामार्गावरून जात असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक कॅबिनला आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने सदर कंटेनर रस्त्याच्या कडेला उभे करून सहचालकासह बाहेर उडी घेतली.काही क्षणात संपूर्ण कॅबिनमधील आगीने रौद्र रूप धारण केल्याने कॅबिन जळून खाक झाली.आगीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व शिरपूर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.घटनास्थळी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती