बातमी कट्टा:- नातेवाईकातील लग्नसमारंभ आटोपून ॲपेरिक्षाने आपल्या गावी जात असतांना 56 वर्षीय व्यक्तीचा चालत्या ॲपेरिक्षातून तोल गेल्याने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 21 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अशोक आवचीत बागुल वय 56 रा.माळीवाडा मु.पो बेटावद ता.शिंदखेडा हे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी शिरपूर तालुक्यातील मांडळ येथे आले होते.लग्नसमारंभ आटोपून आज दि 21 दुपारी ते बेटावद येथे जाण्यासाठी ॲपेरिक्षात बसले होते.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कुरखळी फाट्या नजीक अशोक बागुल यांचा तोल गेल्याने ते चालत्या ॲपेरिक्षातून खाली रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ कदम यांनी अशोक बागुल यांना मृत घोषीत केले.या बाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


